मित्रांनो आपण पाहत आहात कि जग आज
कुठल्या कुठे जात आहे. मग आपण मागे का राहायचे. जस जसे बँक देशात बैंक अकाउंट
होल्डर्स ची संख्या वाढत आहे, त्याप्रमाणे यूजर्स च्या मध्ये एटीएम मशीन आणि एटीएम
कार्ड चे चलन ही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे. अशा या धग धगीच्या जीवनात आपली
मेमरी तरी किती सात देईल, यामुळे काय होतं मित्रांनो कि आपण एटीएम कार्ड द्वारे
पैसे काढायला जातो आणि कामाच्या व्यापामुळे आपण एटीएम कार्ड घरीच विसरून जातो.
पुन्हा घरी एटीएम कार्ड साठी परत यावे लागते. ATM म्हटले कि All
Time Money बँकेत
आपण जमा केलेले पैसे केव्हाही काढण्याची आजादीची सुविधा बँकने दिली आहे. काय होते
कि ATM वर जेव्हा पैसे काढायला जातो आणि ते ATM कार्ड घरीच
विसरून येतो. मग निराश होवून परत जावे लागते.
परंतु मित्रांनो जरा विचार करा कि, जर
बिना ATM कार्ड पैसे मिळाले तर, आहे ना सुटका हो मित्रांनो हे आपण करू
शकतो ते हि अगदी मोफत कोणताही खर्च न करता. मग नेमके कसे करतात ते समजून घेवू या -
यासाठी तुम्हास स्वत:ला रजिस्टर करावे लागेल.
या सुविधेसाठी सर्वात प्रथम तुम्हास त्या बँक मध्ये स्वत:ला रजिस्टर करावे लागेल.
हे रजिस्ट्रेशन बँक ची शाखा किंवा इंटरनेट बैकिंग च्या मदतीनेही करू शकाल. ते रजिस्ट्रेशन
करण्यासाठी तुम्हास बँक चे कस्टमर सर्विस सेंटर वर कॉल करण्याची सुविधाही पुरविण्यात आली आहे.
एकदा का रजिस्टर झाले कि, यूजर ला 4 अंकाचे एक
एमपिन (मोबाइल
पर्सनल आईडेंटीफिकेशन नंबर) मिळेल. हा नंबर एटीएम पिन सारखा असेल. याला यूजर
ट्रांजेक्शन सिक्योरिटी पिन किंवा अथॉरिटी कोड च्या स्वरूपातही वापर करू शकणार.
रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हास त्या
बँकेशी निगडीत एप्लीकेशन तुमच्या मोबाइल वर डाउनलोड करावी लागतील. यासाठी यूजर्स ला
एसएमएस चैनल चे ऑप्शन हि दिले गेले आहे. त्याच्या द्वारे बँक हे एप्लीकेशनचे वेब
लिंक तुमच्या मोबाइल वर पाठवून देईन.
बिना डेबिट कार्ड ची एटीएम मशीन मधून पैसा
काढण्याची हि सुविधा पूर्णपणे मोफत आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानतर तुम्हास एटीएम
कार्ड सारखीच सुविधा एमपिन मधून मिळेल. याच्या मदतीने यूजर इंट्रा बैंक, मोबाइल टू
मोबाइल, मोबाइल टू एकाउंट
फंड ट्रांसफर आणि नेट इलेक्ट्रॉनिक फंड ट्रासफर सर्व करू शकतील.
एमपिन च्या मदतीने तुम्ही 5000/- रुपए प्रति
दिवस पैसे काढू शकतात. आईएमपीएस च्या मुताबित फंड ट्रांसफर मध्ये हे लिमिट वाढून 30000 रु. प्रति दिवस
होईल. एसएमएस च्या संबंधीत हे लिमिट 4000/- रु. प्रति दिवस
आहे. अर्थात सर्व बिल पेमेंट सह लिमिट प्रत्येद दिवस 20000/- रु. प्रति ट्रांजेक्शन आहे.
रजिस्ट्रेशन आणि एमपिन मिळाल्यानंतर
तुम्ही पैसे कसे काढाल, यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलवर डाउनलोड केलेले मोबाइल
एप्लीकेशन उघडा. त्यानंतर एमपिन टाकून कार्डलेस विथड्रॉल बटन वर क्लिक करा. क्लिक करण्या आधी हे लक्षात असू द्या कि जेवढे
पैसे काढायचे आहे ते आधी टाकून घ्या.
त्यानंतर सब्मिट करताच बँकेकडून आपल्या रजिस्टर्ड मोबाइलवर अस्थायी पासवर्ड
पाठवेल. या पासवर्ड च्या मदतीने तुम्ही एप्लीकेशन मध्ये जाऊन दूसरा पासवर्ड जनरेट करावा
लागेल. आता तुम्ही एटीएम मशीन च्या स्क्रिनवर
देण्यात आलेले कैश ऑन मोबाइल ऑप्शन ला निवडा. त्यानंतर मागणी केलेल्या बॉक्स मध्ये
तुमचा मोबईल नंबर, एमाउंट, बैंक द्वारा पाठविण्यात
आलेला अस्थायी पासवर्ड आणि स्वत: तयार केलेला पासवर्ड टाका. या चार गोष्टी जर मैच झाल्यावर
तुम्ही मागणी केलेले पैसे एटीएम मशीन मधून बाहर येतील. या एप्लीकेशन च्या मदतीने
तुम्ही थर्ड पार्टीलाही पैसे पाठवू शकतात.
धन्यवाद मित्रा माझा पण एक ब्लोग आहे shorttricksinhindi.blogspot.in जर तुला ब्लॉग बनविताना काही अडचण असेल तर माझा ब्लॉग पहा तू समाज सेवा करीत आहे तशी मी पण करीत आहे.
ReplyDelete