जेव्हा आपण कंप्यूटर
काम करतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कंप्यूटरला भरपूर प्रमाणात अडचणी
निर्माण होतात. कधी कंप्यूटर ह्यंग होतो तर कधी खुपच स्लो चालतो काही वेळेस तर
चालतच नाही. आणि हो वायरस मुळेही काहीसा असाच प्रकार घडतो. अशा वेळेस आपण खुपच
खचून जातो. काय करायचं कळत नाही. शेवटी आपण कंप्यूटर फोर्मेट करण्याचा चा निर्णय
घेतो. काय करणार पर्याय नाही.
पण
मित्रानो मी पर्याय शोधला आहे. आपले कंप्यूटर फोर्मेट न करता पुन्हा सुरळीत चालू
शकतो. ते म्हणजे System
restore करून यासाठी मी आपणास मार्ग सांगत आहे तसे करा.
2) कीबोर्ड द्वारे F8 कि प्रेस करून सिस्टम सेफ मोड मध्ये सुरु करा.
3) त्यानंतर आकृतीत दाखविल्या प्रमाणे Start Button ला क्लिक करा.
नंतर Programs-- Accessories -- System Tools-- System Restore वर क्लिक करा.
४) त्यानंतर Restore my computer to an
earlier time वर क्लिक
करा, व Next वर क्लिक करा. जसे खाली आकृतीत दर्शविले आहे.
Next वर क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक window open होईल. जे खाली चित्रात दाखविले प्रमाणे...
५) डावी कडेस दिलेल्या Calender वर दिलेली ठळक तारीख जिचा तुम्हास Restore मिळणार आहे तीच्यावर क्लिक करून सिलेक्ट करा.त्यानंतर उजवी बाजूच्या बॉक्स मध्ये System Checkpoint ला क्लिक करून Next वर क्लिक केल्यावर Computer Restart होऊन रिस्टोर होण्यास सुरुवात होईल व थोड्या वेळात पूर्णपणे तुमचे विंडो रिस्टोर झालेले दिसेल. काय मित्रानो जमलं ना अगदी सोप आहे. तरी काहीही अडचण आल्यास जरूर आपली कॉमेंट द्वारे कळवा.
0 comments:
Post a Comment