भारत सरकार द्वारा सर्व भारत वासियांसाठी DIGITAL LOCKER उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आता आपले कागदपत्रे सोबत मिरवायची गरज नाही. कारण DIGITAL LOCKER मध्ये आपण काही महत्वाचे कागदपत्र साठवून ठेऊ शकतो. यात आपण पासपोर्ट, जन्म प्रमाण पत्र, शैक्षणिक प्रमाण पत्र, पेन कार्ड, ड्राइविंग लाईसेन्स असे अनेक प्रकारचे कागदपत्र update करून सदर update ची link ज्यांना पाहिजे त्यांना शेअर करू शकतात. परंतु ज्यांच्या कडे आधार कार्ड आहे तेच डिजीटल लॉकर सुविधेचा फायदा घेवू शकतात. डिजीटल लॉकर ला उघडण्यासाठी तुम्हाला येथे क्लिक करून वेबसाइट वर जाऊन तुमची ID बनवावी लागेल आणि ID बनविण्याठी आधार नंबर ची गरज पडेल, त्यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे. ह्या सुविधेची खास बात म्हणजे एकदा लॉकर मध्ये तुमचे दस्तावेज अपलोड केल्यानंतर तुम्हाला कुठेही सर्टिफिकेट ची मूळ कॉपी देण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्हास फक्त तुमच्या डिजीटल लॉकर ची लिंकचीच गरज पडेल. डिजीटल लॉकर मध्ये अपलोड केलेला डाटा सुरक्षित राहील असे सरकार चे म्हणणे आहे. तसेच आधार कार्ड वर दिलेला मोबाइल नंबरवर वन टाइम पासवर्ड येईल तेव्हा तुम्ही तुमच्या कंप्यूटर वर डिजीटल लॉकर मध्ये लाग इन होईल. म्हणजे तुम्ही http://digitallocker.gov.in/ वेबसाइट वर जाऊन डिजिटल लॉकर मध्ये लॉग-इन साठी आधार नंबर आणि पासवर्ड टाइप करून इंटर दाबल्यावर तुमच्या मोबाईलमध्ये एक कोड येईल तो कोड वेबसाइट वर टाका व इंटर दाबा तेव्हा तुमचे डिजिटल लॉकर उघडू शकतात. हि प्रक्रिया नियमित होत राहील दर ३० मिनिटात वन टाईम पासवर्ड बदलला जातो.
Wednesday, 29 July 2015
माझ्या विषयी थोडक्यात
नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.
0 comments:
Post a Comment