.

ब्लॉग साठी काही सूचना असतील तर जरुर कळवा, त्याची दखल घेतली जाईल.

Wednesday, 20 March 2013

Revo Uninstaller Pro



नमस्कार मित्रांनो मी प्रकाश वाघ आज तुमच्यासाठी एक खास सोफ्टवेर आणले आहे. ते म्हणजे Revo Uninstaller Pro हे खुपच महत्वाचे सोफ्टवेर आहे आपण जेव्हा एखादी सोफ्टवेर Control Panel मध्ये जावून Add or Remove Programs मधून Unistall करतो तेव्हा ते सोफ्टवेर पूर्णपणे Unistall होत नाही. व आम्हास वाटते कि हे सोफ्टवेर (जे तुम्ही Unistall केले ते) Unistall झाले. Unistall करूनही त्याच्या खुपच फाईल आपल्या संगणकात इतर ठिकाणी आढळून येतात. आशा फाईल्स विनाकारण आपल्या संगणकात गर्दी होऊन संगणकाचा स्पीड कमी होतो. म्हणून Revo Uninstaller Pro हे एक असे सोफ्टवेर आहे कि ते जे सोफ्टवेर आपण Unistall करतो त्या सोफ्टवेरच्या एकही फाईल संगणकात शिल्लक राहू देत नाही. म्हणजेच पूर्णपणे Unistall करते व संगणकात कचरा होऊ देत नाही आपल्या संगणकाचा स्पीड कायम ठेवतो. तसेच आणखी भरपूर सुविधा आहेत जसे वेगवेगळे क्लीनर, Backup manager आदी.  

Friday, 15 March 2013

Foxit Reader



पीडीऍफ़ रीडर ची प्रत्येकाला जवळपास गरज असतेच आणि प्रत्येक संगणकात पीडीऍफ़ रीडर इन्स्टाल केलेलाच असतो. परंतु याला म्हणजे पीडीऍफ़ रीडर ला तोड म्हणून आज मार्केटमध्ये Foxit Reader हा पर्याय आला आहे. पीडीऍफ़ रीडर मध्ये फाईल ओपन होण्यास बराच उशीर होतो. परंतु Foxit Reader मध्ये अतिशय वेगाने फाईल ओपन होते. तसेच एडॉब रीडर पेक्षा जास्त सुविधा Foxit Reader टूल मध्ये आहे. व Foxit Reader चा आकारमानही खुपच कमी व वेग हि जलद आणि जास्त सुरक्षित असे सोफ्टवेर आहे.   

Saturday, 9 March 2013

Free Marathi Software CD



नमस्कार मित्रानो मी प्रकाश वाघ आज मी असी साईड बद्दल माहिती सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हास अगदी मोफत मराठी  साँफ्टवेयर ची सीडीची घरपोहच मागणी करता येईल. या सीडी मध्ये मुख्य आहे ते म्हणजे --
१. फ़ॉन्ट २. कोड परिवर्तक ३. वर्तनी संशोधक ४. ओपन ऑफ़िस ५. मैसेंजर ६. ई-मेल क्लायंट ७. ओ सी आर
८. शब्दकोश ९. ब्राउज़र १०. ट्रांसलिटरेशन ११. कॉर्पोरा १२. शब्द-संशोधक
  

Thursday, 7 March 2013

Chitrankan Digital Software


नमस्कार मित्रानो मी प्रकाश वाघ तुमच्या साठी, आता मराठी डॉक्युमेंटला पण स्कैन करून टेक्स्ट फाइल मध्ये बदल कारण अगदी सोप झाले. भारत सरकार चे सूचना प्रौद्योगिकी संस्था Centre for Development of Advanced Computing (C-DAC) ने छापलेले मराठी चे शब्दला डिजीटल रूप मध्ये बदलण्यासाठी एक सॉफ्टवेयर बनवले आहे. ते आहे चित्रांकन (Chitrankan) Marathi OCR. आता तुम्ही मराठीत लिहलेले किवा छापलेले अक्षरास विना टाईप या सॉफ्टवेयरची मददतिने टेक्स्ट च्या रुपात प्राप्त करून त्यात बदल करू शकतात. तसेच मराठीतच नाही तर हिंदीतही बदल करू शकतात.

Wednesday, 6 March 2013

BSR Screen Recorder version 6.1.7



नमस्कार मित्रानो मी प्रकाश वाघ आज आपल्यासाठी अतिशय महत्वाचे सॉफ्टवेयर आणले आहे ते म्हणजे, व्हीडीओ, ध्वनि आणि काहीही म्हणजे फोटो, फिल्म जे तुम्ही तुमच्या screen वर बघत असाल ते capture व recording करणे. स्क्रीन चा कुठलाही भाग, स्क्रीनची कुठलीही window capture केली जाते. तुम्ही तुमचा वेब केम सत्र,मनपसंद गेम्स, डेस्कटॉप वरील कोणतेही सॉफ्टवेयर, तुमच्या स्क्रीनवर कोणत्याही व्हीडीओचे प्रदर्शन, व्यापार साठी व्हीडीओ ट्यूटोरियल, फिल्म आणि फोटो स्टुडीओ, Recording केलेले
व्हीडीओ फाईल्स convert करणे आणखी खूप काही. हे सॉफ्टवेयर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Tuesday, 5 March 2013

Rail Line Information


 रेल्वे वेळापत्रक - हिंदी मध्ये

जर तुम्हास एखाद्या रेल्वे बद्दल माहिती पाहिजे असेल समजा दिल्ली ते मुंबई साठी कोणकोणती रेल्वे आहे, किवा तुम्ही घेतलेले वेटिंग तिकीट ची स्तिथी काय आहे हे पाहण्यासाठी hindi.indiarailinfo.com ह्या वेब साईटची मदत घेवू शकतात.या वेबसाईट ची सर्व माहिती हिंदीमध्ये असते. तसेच आपले Online Rugistration करण्यासाठी indiarailinfo.com ह्या वेबसाईटवर करू

माझ्या विषयी थोडक्यात

नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.

subscriptions

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Translate Your Languages

Powered by Blogger.

Total Pageviews

Subscribe

Blogger Tips and TricksLatest Tips For BloggersBlogger Tricks