काय WhatsApp ला तुम्हाला तुमच्या पीसी
वर किंवा लैपटॉपवर वापर करण्याची
इच्छा आहे, पण करायचे कसे माहीत नाही. मग चिंता कशाला यासाठी WhatsApp च्या
या नवीनतम सर्विस ला वॉट्सऐप वेब नावाने
लॉन्च केले गेले आहे. यासाठी कोणतेही सॉफ्टवेयर पीसी मध्ये किंवा लैपटॉपवर
डाउनलोड करण्याची गरज नाही. WhatsApp
ला कंप्यूटर किंवा लैपटॉप मध्ये वापरण्यासाठी
सर्वप्रथम तुम्हास तुमच्या मोबाइल मध्ये WhatsApp ला अपडेट करावे लागेल आणि तुमच्या कंप्यूटर किवा लैपटॉप
मध्ये Google Chrome ब्राउज़र इंस्टॉल करावे लागेल.
कारण WhatsApp ची ही नवीन सर्विस ला वॉट्सऐप वेब नावाने लॉन्च केले गेले आहे. त्यामुळे हे Google Chrome मध्येच उघडू शकते.
आता तुमच्या पीसी वर Google Chrome ब्राउज़र
ओपन करा. त्यात https://web.whatsapp.com
ओपन करा. तुम्हास खालीलप्रमाणे QR कोड दिसेल,
त्यानंतर मोबाइल मध्ये whatsapp ला ओपन करा. नतर मेनू मध्ये जाऊन WhatsApp Web ला क्लिक करा.
WhatsApp Web ला क्लिक केल्यावर तुमचा मोबाईलचा
कैमरा चालू होईल. तुम्ही पीसी किंवा लैपटॉप मध्ये https://web.whatsapp.com ही साईट ओपन करून ठेवली असेल
त्यात जो QR कोड दिसत असेल त्याच्या समोर तुमचा मोबाईल धरा कारण तो QR कोड
स्कैन करेल.
जेव्हा स्कैन पूर्ण होईल तेव्हा तुमचे whatsapp
तुमच्या कंप्यूटर किंवा लैपटॉप
वर उघडून जाईल.
महत्वाची सूचना- यासाठी तुमच्या पीसीवर किंवा लैपटॉपवर नेट कनेक्शन
असणे आवश्यक आहे.
0 comments:
Post a Comment